जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती दिनानिमित्त कार्यक्रम

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार, दि. 15 जून रोजी ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त (World Elder Abuse Awareness Day) दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळा व चर्चासत्राचे उद्‌घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ सिने अभिनेते रमेश देव आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.