113 आमदारांना घेऊन कुमारस्वामी पोहचले राजभवनात

बंगळुरु : कर्नाटकात कुणाचे सरकार स्थापन होणार ही बाब आता स्पष्ट झाली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी सरकार बनविण्यासाठी भाजपाला आमंत्रित केले आहे. राज्यपालांनी बी. एस. येदियुरप्पा यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास म्हटले आहे. यावर येदियुरप्पा यांनी विधानसबेत बहुमत सिद्ध करण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला आहे. आज सायंकाळी कुमारस्वामी यांननी काँग्रेस-जेडीएसच्या एकूण 113 आमदारांना घेऊन राजभवनात पोचले आणि जेडीएस नेता कुमारस्वामी, काँग्रेस आमदार जी परमेश्वर आणि रेवन्ना यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांनी भेट घेऊन समर्थनाचे पत्र राज्यपालांना दिले.

कुमारस्वामी आणि जी. परमेश्वर यांनी सांगितले कि त्यांनी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. आशा आहे कि राज्यपाल घटनेला अनुसरून निर्णय घेतील. ते म्हणाले कि जर आम्हाला सरकार बनविण्याची संधी मिळाली नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू. आता राज्यपालांच्या निर्णयावर काँग्रेस जेडीएस काय भूमिका घेते ते बघणे महत्वाचे ठरेल.