निवडणुका आल्या कि औरंगाबादेत दंगल का होते?- हुसैन दलवाईं

औरंगाबाद : निवडणुका जवळ आल्या कि औरंगाबादेत दंगल का होते? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्या हुसैन दलवाई यानी केला आहे. पोलिसांच्या मदतीने एका समाजावर हल्ला करण्यात आल्याचे दिसून येते. येथे पोलिसांनी वर्दी काढून ठेवली होती, असा आरोपही त्यांनी केला.

दलवाई यांनी बुधवारी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना होते, ही दंगल घडवून आणण्यात आणण्यात आली. येथे खासदार चंद्रकांत खैरे हे दंगल भडकवताना दिसतात. तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. ज्यांच्या घराची हानी झाले, ज्यांचे कुटुंबीय या दंगलीत गमावले, त्यांच्याच घरात जावून पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केल्याचा आरोपही त्यांनी केला. गृहखाते हे स्वत: मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करायला हवी होती मात्र चार दिवस लोटल्यानंतरही ते आले नसल्याचे दलवाई म्हणाले.