तेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत

पुणे : राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमधे सुवर्णपदक पटकावरी तेजस्विनी सावंत पुण्यात आली तेव्हा तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रोन मधे रौप्यपदक पटकवले होते.

विमानतळावर पुणेरी पगडी घालून तेजस्विनीची मिरवणूक काढण्यात आली. विमानतळावर चांगलीच गर्दी झाली होती. आपल्या यशाचं श्रेय तेजस्विनीने कुटुंबीय आणि गुरुंना दिलं.