ज्यांना आपले शेअर्स पाहिजेत, त्यांना आम्ही ते परत करु : सुभाष देशमुख

सोलापूर : भागधारांची फसवणूक केल्याप्रकरणी सेबीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल समूहावर’ जप्तीची कारवाई केली.मात्र, या कारवाईनंतर देशमुखांनीच सेबीवर पलटवार केला. ज्यांना आपले शेअर्स पाहिजेत, त्यांना आम्ही ते परत करु,असे सुभाष देशमुख यांनी सांगितले. देशमुखांसह त्यांच्या नातलगांनी केलेले व्यवहार ही भागधारकांची फसवणूक असल्याचा आरोप आहे.

लोकमंगलने शेतकऱ्यांच्या जमिनी कमी पैशात खरेदी केल्या. या जमिनींची आजची किंमत १०८ कोटी रुपयांच्या घरात आहे. ही रक्कम दहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना परत करण्याचा सूचना सेबीने दिल्या आहेत. म्हणजेच लोकमंगलला आता शेतकऱ्यांना १२० कोटी रुपये परत करावे लागणार आहेत.

मात्र, यावेळी देशमुखांनी सेबीचे नियम माहित नसल्याचा दावा केला आहे. कारखाना काढताना आम्ही सेबीचे नियम माहित नव्हते. त्यामुळे ज्या भागधारकांना आपले शेअर्स पाहिजे आहेत, त्यांना आम्ही ते परत करु, असं आश्वासन सुभाष देशमुख यांनी यावेळी दिले.