बहुमत सिद्ध करून दाखऊ – येडियुरप्पा

बंगरुळु : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आपण कर्नाटक विधासभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू असा दावा केला आहे. ते म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो आम्हाला मान्य असून त्याचे तंतोतंत पालन केले जाईल. मुख्य सचिवांशी चर्चा करुन उद्याच विधानसभेचे सत्र बोलवू. उद्या आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करुन दाखवू याची १०० टक्के खात्री आहे असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला.

काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात येडियुरप्पांचा घटनेच्या विरुद्ध जाऊन होणारा शपथविधी रोखण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात जाऊन आम्ही येडियुरप्पांचा शपथविधी रोखू शकत नाही, मात्र, त्यावर सुनावणी घेण्यात येईल असे १७ तारखेला मध्यरात्री सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. तसेच १८ तारखेला येडियुरप्पांना बहुमताचा आकडा दाखवणाऱ्या आमदारांच्या नावांची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहे.

सोबतच येडियुरप्पा सरकारने बहुमत चाचणीपर्यंत कुठलेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. यावर भाजपाची बाजू मांडणाऱ्या रोहतगी यांनी तसे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारीही दर्शवली. तसेच पोलीस महासंचालकानी बहुमत चाचणीच्या वेळी विधीमंडळाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहे.