‘वॉलपेपर्सने’ भिंतीला बनवा आकर्षक

wallpaper

आजकाल मार्केटमध्ये घराच्या सजावटीसाठी वेगवेगळे आॅप्शन पाहायला मिळतात. त्यातला एक प्रकार म्हणजे ‘वाॅलपेपर’. भिंतीच्या रंग रंगोटी करण्यापेक्षा वाॅलपेपर लावण्याचा ट्रेंड सध्या सगळीकडे सुरु आहे. यामुळे भिंतीचा आकर्षकपणा वाढतो व त्याला नवा लुक मिळतो. त्यात निसर्गाची चित्रे किंवा साधे मखमली पेपर यासारख्या पॅटर्नच वापर केल्याने भिंती जिवंत दिसतात. वॉलपेपर हे विविध रंग, नमुने आणि जोड्यांमध्ये येतात. यामुळे त्यांचे सौंदर्य वाढते. याचा वापर फक्त भिंतीपुरता मर्यादित न ठेवता, शेल्फ, दरवाजे, क्लोसेट, पायऱ्या किंवा अगदी दिव्यांवरही तुम्ही आकर्षक रंगाचे वॉलपेपर वापरू शकता.

  • व्हिनाईल वॉलपेपर – कठीण आणि ठळक व्हिनाईल वॉलपेपर जलरोधक आहे आणि सर्वात टिकाऊरित्या भिंत आच्छादिली जाते. हे वॉलपेपर उच्च दमट परिस्थितीतही फार काळ टिकतात. तुम्ही हॉल, बाथरुम, स्वयंपाकघर आणि मुलांच्या खोलीतही हे वॉलपेपर वापरू शकतात.

  • व्हिनाईल-कोटेड वॉलपेपर – हा वॉलपेपरचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यावर व्हिनाईलचा संरक्षणात्मक कोट आहे. व्हिनाईल कोट स्वच्छ करायला सोपे आणि टिकाऊ असते. वापरण्यासाठी अनुकूल आणि काढण्यासाठी सोपे असा हा वॉलपेपर संपूर्ण व्हिनाईल वॉलपेपरच्या तुलनेने उत्तम पर्याय मानला जातो.

  • फ्लॉक वॉलपेपर – या वॉलपेपरच्या प्रकारामध्ये वेलवेटवरील कणांसारख्या फायबरचा वापर केला आहे. वॉलपेपरवरील व्यस्त डिझाईन आणि क्लिष्ट कला आपल्या खोलीला राजेशाही स्वरुप देते. हा वॉलपेपर डायनिंग रुम आणि बेडरुमचे स्वरुप वृद्धिंगत करण्यासाठी वापरू शकता.

  • साधा वॉलपेपर – याप्रकारच्या वॉलपेपरमध्ये संरक्षणात्मक थर नसतो आणि फक्त हेच वॉलपेपर मिश्रित रंगामध्ये उपलब्ध असतात. हे वॉलपेपर नाजूक आणि भिंतीवरून काढण्यासाठी अवघड आहे. उच्च दमट परिस्थिती फार काळ तग धरू शकत नाहीत.

तुमच्या भिंतीला शोभेल असे वॉलपेपर निवडा आणि घराला सुंदर, नवे लुक द्या.