‘चले जाव’ आंदोलन महात्मा फुलेंनी सुरू केले ; अजित पवारांची घोडचूक

मुंबई : नेहमी वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘चले जाव आंदोलन महात्मा फुलेंनी’ सुरू केल्याचे म्हणत पुन्हा मोठी चूक केली आहे. एका भाजप नेत्याच्या विधानाचा संदर्भ देताना चले जावे आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे अजित पवारांनी सांगितले. मात्र, महात्मा फुलेंच्या चले जाव आंदोलनामुळे, असा उल्लेख त्यांनी केला.

दरम्यान, अजित पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अजित पवारांना देशाचा इतिहासच माहिती नसल्याची टीकाही नेटीझन्सकडून करण्यात येत आहे.

भाजपच्या एका मोठ्या नेत्याने चले जाव आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे म्हटले होते. याचा, अर्थ महात्मा गांधींच्या अहिंसकमार्गाने देशाला मिळालेले स्वातंत्र्य या नेत्यांना मान्य नाही, असे अजित पवार यांना म्हणायचे होते. मात्र, महात्मा गांधींऐवजी महात्मा फुलेंच्या चले जाव आंदोलनामुळे ब्रिटीश देशाबाहेर गेले, असे पवार यांनी म्हटले.