एमपीएससी स्पर्धा परिक्षाच्या विद्यार्थ्याने दिले धनंजय मुंडेना विविध मांगण्याचे निवेदन

नागपूर : एमपीएससी तर्फ पीएसआय पदाकरीता सन २०१७ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. परंतु अद्याप निकाल जाहिर करण्यात आला नाही. परिक्षेत पास होण्याचे स्वप्न पाहणारे अनेक मुल मुली मागील आठ महिन्यांपासून शारीरीक चाचणीचा सराव करीत आहेत. परंतु एमपीएससीकडून कोणतेही प्रकारचे नोटीफिकेशन जारी करण्यात आलेली नाही.व कोणत्याही प्रकारचे उत्तर देत नसून आता गरीब होतकरू स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व फौजदार बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न भंग होणार असल्याने एमपीएससी स्पर्धा परिक्षाच्या विद्यार्थ्याचे एक शिष्टमंडळ विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना भेटून एमपीएससी तर्फ पीएसआय पदाकरीता सन २०१७ मध्ये घेण्यातआलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल त्वरित लावण्यात यावा या मांगणीचे निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात छाया सुखदेवे, कल्पना चव्हाण, चंदा सिंगारे, प्रीती भलावे आदी उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी वरील मुद्दा सभागृहात मांडणार असल्याचे आश्वासन दिले.