उत्तर प्रदेशात पुन्हा वादळी पावसाचा तडाखा; १० जणांचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशातपुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यांनतर आलेल्या वादळाचा तडाखा पाहायला मिळाला. बुधवारी उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये भीषण वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज पडून १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण जखमी आहेत.यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सीतापूरच्या ६ जणांचा तर गोंडा येथील ३ आणि फैजाबादच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

मंगळवारीच हवामान खात्याने याबाबत इशारा दिला होता. फैजाबाद आणि लखनऊच्या परिसरात धुळीच्या वादळाचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. राजधानी दिल्लीमध्येही बुधवारी हवामान बदललेलं पाहायला मिळालं , येथे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. पुढील तीन दिवस येथे धुळीचं साम्राज्य असू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.