आता भारताला भेटणार यूएसचे अपाचे हेलिकॉप्टर

वॊशिंग्टन: अमेरिकेने भारताला ९३ करोड डॉलरमध्ये सहा एएच-६४ई अपाचे हेलीकॉप्टर विकण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. अटॅक हेलिकॉप्टरच्या व्यतिरिक्त या अनुबंधात अग्नी नियंत्रण रडार ‘हेलिफायर लॉंगबो मिसाईल’ स्टिंगर ब्लॉक आई-९२ एच मिसाईल, तसेच रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यास सक्षम असलेले नाईट व्हिजन सेन्सर व जडत्वीय नौवाहन प्रणाली (इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टिम) ची विक्री देखील समाविष्ट आहे.

पेंटॅगनच्या डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी ने या संबंधी विदेश मंत्रालयाच्या निर्णयाला घेऊन काँग्रेसला अधिसूचित केले आहे. कुठल्याही संसदांकडून विरोध न झाल्यास ही विक्रीची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

पेंटॅगाॅनने काँग्रेसला याची अधिसूचना पुढल्या महिन्यात वॊशिंग्टन डीसीमध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या पहिल्या द्वीसत्रीय बैठकीच्या आधी दिली आहे. येत्या महिन्यात विदेशमंत्री सुषमा स्वराज व रक्षामंत्री निर्मला सितारमन आणि त्यांचे अमेरिकी समकक्ष क्रमशः माईक पॉम्पीओ व जेम्स मैटीस यांच्यामध्ये एक बैठक होईल. पेंटॅगनचे म्हणणे आहे की या करारामुळे आंतरिक किंवा क्षेत्रीय संकटांचा सामना करण्यात भारताच्या क्षमतेला मजबुती मिळेल.