काश्मिरवरील संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल पक्षपाती : भारत

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र संघाने जम्मू-काश्मीरमधील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनावर पहिल्यांदा एक रिपोर्ट जारी केली असून यावर आक्षेप घेतला आहे. ही रिपोर्ट पाक अधिकृत काश्मीरच्याबाबतीतसुद्धा आहे. संयुक्त राष्ट्र संघाने तथाकथित मानावधिकार उल्लंघनाच्या प्रकरणी मुद्दांना उपस्थित करताना यांची आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. भारताने काश्मीरावर संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टला चुकीची तसेच पक्षपातपूर्ण असल्याचे म्हटले आहे. ऐवढेच नव्हे तर भारताने आपले सार्वभौमत्व आणि क्षेत्रिय अखंडतेवर हल्ला म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने ही रिपोर्ट जारी करताना पाकिस्तानलासुद्धा म्हटले आहे कि, त्यांनी दहशतावादी कायद्यांचा उपयोग शांतीपूर्ण कारवाया करणा-या लोकांना त्रास देण्याच्या हेतुने तसेच असंतोषाचे दमन करण्यासाठी करू नये. काश्मीरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या मुद्दावर तात्काळ समाधानच्या गरजेवर जोर देताना रिपोर्टमध्ये म्हटले आहे कि, काश्मीरातील राजनीतीक समाधानाच्या कुठल्याही प्रस्तावात ही बाब समाविष्ट असली पाहिजे कि तिथे हिंसेचे चक्र बंद व्हावे आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी जबाबदारी ठरविण्यात यावी.

या रिपोर्टवर भारतीय अधिका-यांचे म्हणणे आहि कि जम्मू-काश्मीर आणि पाक अधिकृत काश्मीरात कुठल्याही प्रकारे तुलना होऊ शकत नाही. कारण की जम्मू-काश्मीरात जिथे लोकतांत्रिक पद्धतीने सरकार निवडले गेले आहे दुसरीकडे पीओकेत कुठल्याही पाकिस्तानी राजकीय नेत्याच्या मनमाने पद्धतीने प्रमुख नियुक्त केल्या जातो.