मोदींच्या नेतृत्यावात 2019 मध्ये भाजपाचे सरकार : अमित शहा

नवी दिल्ली : कर्नाटकमधील निकालावरुन जनतेचा मोदींवरील विश्वास पुन्हा सिद्ध झाला असल्याचे सांगून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, या विश्वासावरच 2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन करु. विकासयात्रेमुळेच 15 व्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पक्ष मुख्यालयात स्वागत केले आहे.