२३ ला उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे २३ एप्रिलला रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. सध्या भाजपा आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादात नाणार प्रकल्पाची भर पडली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नाणार बाबत काय भूमिका घेणार, या संदर्भात सर्वांना उत्सुकता आहे. यावेळी उद्धव ठाकरे प्रकल्पबाधित नाणार गावाला भेट देतील व ग्रामस्थांशी चर्चा करतील.

नाणार प्रकल्पाविरुद्ध शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाणार प्रकल्पाला वेग देण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत असताना शिवसेनेचा विरोध आणखी वाढतो आहे, हे उल्लेखनीय.

मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केला, असं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणत असताना, उद्धव ठाकरे यांना मी नाणार विषयी समजावून सांगेन, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देऊ नका, अशी भूमिका घेतली आहे.