उद्धव ठाकरे हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांना भेटणार

मुंबई : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अहमदनगर येथे घडलेल्या शिवसैनिकांच्या हत्येनंतर २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उद्धव ठाकरे घटनास्थळी भेट देणार आहेत. त्यानंतर हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या घरी जाऊन ते कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत.

अहमदनगर दुहेरी हत्याकांडाच्या संदर्भात अहमदनगरमधील शिवसैनिकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्या सोमवारी हत्या झालेल्या शिवसैनिकांचे दहावं झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे आदेश गृहविभागाने एसपींना देण्यात आल्याची माहिती शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना दिली. त्यामुळे उद्या रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर नगरमधील केडगावला जाणार आहेत. तसंच शिवसैनिकांवर अटकेची कारवाई करण्यात आली तर मंगळवारी हजारो शिवसैनिक नगरहून मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी वर्षावर दाखल होणार.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ठिय्या आंदोलन करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तसे आदेशच शिवसैनिकांना दिले आहेत. यावेळी शिवसेना नेते अनिल राठोड, लोखंडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर उपस्थित होते.