अबब ! सोलापुरात जन्‍मले दोन डोकी असलेले ‘सयामी जुळे’ बाळ

सोलापूर : येथे दोन तोंड, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका आणि धड मात्र एक अशा प्रकारचे सयामी जुळे बाळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये नुकतेच जन्मले आहे. ज्यावर येथील डॉक्टर संशोधन करून यापुढे अशा घटना टाळता येतील यावर संशोधन करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरातील विडी घरकूल परिसरातील महिलेला प्रसूतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गुरूवारी दाखल झाली. प्रसूती कळा येत असल्याने त्यांची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करण्यता आली. त्यामध्ये पोटात दोन तोंडे असलेले बाळ असल्‍याची डॉक्टरांना आढळले. डॉक्टरांनी त्या मातेला आणि त्‍यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली.यानंतर त्या मातेने स्त्री जातीच्या सयामी जुळ्या बाळाला जन्म दिला. त्या बाळाचे वजन तीन किलो नऊशे ग्रॅम आहे. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका, दोन हात, दोन पाय, एक लिव्हर आणि दोन किडनी असलेल्रा बाळाला शरीर मात्र एकच आहे. जी लाखातील एक आणि सिव्हील हॉस्पिटलमधील पहिलची घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या बाळाच्या कुटुंबीयांची ओळख सिव्हिल प्रशासनाने गुप्त ठेवली आहे. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिरनकर, बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. एस. व्ही. सावस्कर, बालरोग चिकित्सक डॉ. सुदर्शन चक्रे, बालरोग शल्रचिकित्सक डॉ. रवी कंदलगावकर हे सयामी जुळे बाळ आणि त्याच्या आईवर उपचार करीत आहेत.

या बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. अशा बाळांना फुफ्फूस, ह्दयाचे इतर आजार असू शकतात. असा प्रकारे जन्मणारे बाळ लाखात एक असू शकते. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या बाळावर बालरोग विभाग प्रमूख डॉ. शाकिरा सावस्कर, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुदर्शन चक्रे उपचार करीत आहेत, या बाळाच्या आजाराची कल्पना त्याच्या पालकांना अगोदरच होती. प्रसूतीपूर्व तपासणीमध्ये याचे निदान झाले होते. रुग्णालयात स्त्रीरोग विभागप्रमूख डॉ. विद्या तिरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिझर करण्यात आले. हॉस्पिलटलचे तज्ज्ञ डॉक्टरांसह डॉ. जय धडके, डॉ. श्रवण बाळाच्या उपचारावर लक्ष ठेऊन आहेत, त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.