पंजाब मध्ये दोन गटात तणाव

नवी दिल्ली : पंजाबच्या कपुरथला जिल्ह्यातील फगवारा गावात डॉ आंबेडकर जयंतीच्या आदल्या रात्री दोन गटात हाणामारी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापने वरून हा तणाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानीय वाल्मिकी चौकातून हा पुतळा घेऊन जात असतांना शिवसेना नेते राजेश पलटा यांनी दुसऱ्या गटाला मारामारी केली असा आरोप केला जात आहे. या सर्व प्रकारा नंतर पोलीस सुरक्षा तैनाद करण्यात आली आहे .