निर्दयता ! दोन दिवसांच्या चिमुरडीला केले टॉयलेटमध्ये फ्लश

केरळ : दोन दिवसांच्या चिमुरड्या जीवाची टॉयलेटमध्ये फ्लश करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना केरळमधील पलाक्कड जिल्ह्यात समोर आली आहे. दवाखान्यामधील शौचलयाचा पाइप ब्लॉक झाल्यामुळे प्लंबरला बोलावण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पाइप साफ करत असताना त्या दोन दिवसांच्या मुलीचा चिमुकला मृतदेह प्लंबरच्या हाती लागला. एका दोन दिवसाच्या नवजात जीवाला टॉयलेटमध्ये फ्लश करण्यात आले होते.

सध्या तिच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. शुक्रवारी सकाळी डॉ अब्दुल रहमान यांना शौचालयाच्या पाइपमध्ये काहीतरी अडकलं असल्याचे लक्षात आले. यामुळे त्यांनी प्लंबरला बोलावून पाइप दुरुस्त करण्यास सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लंबर पाइप साफ करत असताना चेंडूसदृश्य काहीतरी त्यामध्ये अडकलं असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने खेचून बाहेर काढले असता सर्वांना धक्का बसला, कारण तो एका नवजात मुलीचा मृतदेह होता. पोलीस या सर्व प्रकारचा शोध घेत आहेत.