अवैध स्पोटके विकणारे २ आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ठाणे : अवैध्य रित्या विक्री करण्यासाठी आणलेल्या स्फोटक पदार्थसह दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साळेगाव कर्जत येथील अशोक ताम्हणे (वय २८ ) आणि समीर धुळे (वय २४ ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बेकायदेशीर रित्या स्पोटके विक्री करण्यासाठी तरुण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. रविवारी संध्याकाळी तळोजा रस्त्यावरील खोणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. अशोक ताम्हणे आणि समीर धुळे हे दोघे मोटारसायकलने त्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांच्या खांद्याला सॅक अडकल्या होत्या. या दोघांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे जिलेटीन ट्यूबचे १९९ नग आणि पांढऱ्या रंगाची वायरिंग असलेले इलेक्ट्रीक डीटोनेटरचे १०० नग असे स्फोटक पदार्थ पोलिसांना मिळाले.