नवापुरनजिक महामार्गावर ट्रकने अचानक घेतला पेट

नवापूर:  आज पहाटे अचानक ट्रकने पेट घेतल्याने नवापुर तालुक्यातील महामार्गावरील वाहतूक तासभर बंद होती. ही घटना चिंचपाडा रेल्वे गेजवळ घडली. दोन्ही बाजूला वाहनांचा आठ किलोमीटर पर्यंत वाहनाचा रांगा लागल्या होता. ही घटना चिंचपाडा गावात घडल्याने ग्रामस्थांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. महामार्ग संपूर्ण बंद करण्यात आला होता. परंतू रेल्वे विभागाने रेल्वे वाहतूक सुरू ठेवली होती.

नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे गेटजवळ शनिवारी पहाटे अचानक ट्रकने पेट घेतला. यामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर बंद होती. ट्रक पेटलेला असताना रुळावरून काही एक्सप्रेस रेल्वेही धावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुदैवाने कोणातही जीवितहानी झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांना व नवापूर नगर पालिका अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.