माजी महासंचालक प्रमोद माने यांना श्रद्धांजली

मुंबई : निवृत्त सनदी अधिकारी, माजी महासंचालक प्रमोद माने यांच्या निधनाबद्दल मंत्रालय माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आज शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर आदि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.