‘दिलखुलास’ कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. 16 आणि गुरुवार दि. 17 मे 2018 रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

परिवहन विभागामार्फत राज्यभरात रस्ते सुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला. रस्ते सुरक्षा पंधरवडा, आयोजनामागची भूमिका, त्याची यशस्वीता, राबविण्यात आलेले विविध उपक्रम, अपघातासंदर्भातील ‘गोल्डन अवर’ ही संकल्पना, ‘हॅार्न नॅाट ओके प्लीज’ हे अभियान, शासनाने रस्ते सुरक्षा निधी उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप आणि त्या निधीचा वापर आदी माहिती श्री. रावते यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक मनाली दीक्षित यांनी ही मुलाखत घेतली आहे.