‘रेस-३’चा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: अभिनेता सलमान खान याचा बहुचर्चित असा ‘रेस ३’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवार १५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. २०१८मधला हा दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. तगडी स्टारकास्ट, आधीचे दोन ब्लॉकबस्टर भाग आणि सलमान खान या तीन गोष्टींमुळे रेस-३ आधीपासूनच चर्चेत आहे. सलमानच्या चित्रपट परंपरेप्रमाणे हाही चित्रपट येत्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रेमो डिसोझा दिग्दर्शित ‘रेस ३’मध्ये सलमान, अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन, डेझी शाह आणि साकीब सलीम हे कलाकार आहेत. रेस-३ या चित्रपटाचं मुख्य आकर्षण बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान असणार आहे.