सोनाली कुलकर्णी अभिनित ‘हंपी’चा ट्रेलर प्रदर्शित !

- फ्रेश आणि आकर्षक आहे सिनेमाचा लूक

मुंबई : वेगळ्या पठडीचे चित्रपट बनविणारा दिग्दर्शक प्रकाश कुंटे याचा नवा सिनेमा ‘हंपी’ येत्या १७ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा लुक आणि पार्श्वभूमी ही फ्रेश असून चित्रीकरण आऊटडोअर लोकेशन्सवरच झाले आहे. कर्नाटकमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.

हंपीमधे सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. प्रियदर्शन जाधव याचीही चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका नव्या लुकमधे प्रेक्षकांना या चित्रपटात बघायला मिळेल.

सोनाली, ललित आणि प्राजक्ता हे तिघे प्रथमच एकमेकांसोबत काम करत असून प्राजक्ता व ललितची जोडी याआधी ‘जुळून येती रेशीमगाठी’ मधे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

प्रकाश कुंटे याने ‘हंपी’च्या आधी ‘कॉफी आणि बरंच काही’, अँड जरा हटके अश्या हटके चित्रपटांचे दिगदर्शन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याकडून काही वेगळे पाहायला मिळेल, असा विश्वास आहे. एकूणच हंपीचा ट्रेलर तर अंत्यंत आकर्षक व फ्रेश आहे. तेव्हा चित्रपटही तेवढाच आकर्षक असेल अशी आशा करायला हरकत नाही.