Happy B’day… धक धक गर्ल माधुरी दिक्षितचे टाॅप १० गाणे

Madhuri

हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी तसेच डांन्सिग क्विनच्या नावाने आपली छाप सोडणारी धक धक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ चा आज वाढदिवस. उत्तम अभिनय आणि बहार नृत्याने सर्वांना मोहिनी घालणारी माधुरीने आज वयाची ५१ वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या मधुर हास्याने जवळजवळ दोन दशकं अख्ख्या भारतवर्षाला माधुरी दीक्षितने वेड लावून बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक असे हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाने तर तिने सर्व चाहत्यांचे मन जिंकलेच होते. मात्र तिच्या नृत्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. माधुरीचे असेच काही गाजलेले गाणे बघा….

  • धक धक करने लगा :- बेटा या चित्रपटातील माधुरीचे हे गाणे अतिशय लोकप्रिय गाण्यामधील एक आहे. या मध्ये माधुरी एकदम हाॅट अंदाज मध्ये दिसली होती.
  • एक दो तीन :- ‘मोहिनी, मोहिनी…’ च्या जल्लोषात स्टेजवर येणाऱ्या माधुरी दीक्षितच्या ‘एक, दो, तीन..’ गाण्याने सर्वांनाच वेड लावले होते. नुकताच ‘बागी’ सिनेमाच्या सिक्वलमध्ये हे गाणं घेण्यात आलं आहे.

  • हमको आज कल है :- ‘सैलाब’ चित्रपटातील या गाण्याला सरोज खान यांनी कोरियोग्राॅफ करून फिल्मफेअरचा बेस्ट कोरियोग्राॅफीचा पुरस्कार मिळविला. त्यात माधुरीच्या अदाने सर्वांना दिवाना केला होता.
  • दीदी तेरा देवर दिवाना :- १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हम आपके है कोण या मधील या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही लग्न समारंभात हे गान हमखास ऐकायला मिळतो.
  • के सेरा सेरा :- या गाण्याद्वारे माधुरीला प्रसिद्ध नर्तक प्रभू देवासोबत नृत्य करण्याची संधी मिळाली. माधुरी चित्रपटसृष्टीतील उत्तम नर्तक असल्याचे या गाण्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
  • चोली के पिछे क्या है :- खलनायक मधील हे गाण माधुरीचा सर्वात हिट गाण्यामधील एक होता.
  • कथ्थक :-  माधुरीने कथ्थक या नृत्यशैली मध्ये कौशल्य प्राप्त केले होते. यशराजच्या दिल तो पागल है या चित्रपटात तिने कथ्थकचे उत्तम नृत्य सादर केले होते.

  • मार डाला:-  देवदास चित्रपटात माधुरीने चंद्रमुखीची भूमिका साकारून अनेकांची मने जिंकली. चंद्रमुखीच्या आश्रयाला आलेला देवदास तिच्या प्रेमात पडतो. मार डाला या गाण्याच्या दरम्यान तिने जवळजवळ ३० किलो वजनाचा पोशाख घातला होता. या गाण्यातील तिच्या अदाकारीने अनेकांना मोहित केले.
  • आजा नचले :-  आजा नचले चित्रपटातील हे शीर्षक गीत. देवदासनंतर चित्रपटांपासून दूर राहिलेल्या माधुरीने यश राज फिल्म्सच्या या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुरागमन केले. चित्रपटाने फार काही चांगली कामगिरी केली नाही. परंतु, नेहमीप्रमाणे चित्रपटातील माधुरीच्या नृत्याचे कौतुक झाले.
  • घागरा :-  वयाला मागे सारत कमालीची तरुण दिसणाऱ्या माधुरीने चित्रपटातील या गाण्याद्वारे तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण करून दिली. अयान मुखर्जीच्या ये जवानी है दिवानी या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता, तर माधुरीने पाहुणा कलाकार म्हणून चित्रपटात दिसली होती. या गाण्यादरम्यानची रणबीर आणि माधुरीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री सिनेरसिकांना चांगलीच भावली आणि गाण्यानेदेखील फार कमी वेळात लौकीक प्राप्त केला.