येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आज फैसला

नवी दिल्ली : मोठ्या नाटकीय घडामोडीनंतर भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांच्या मुख्यमंत्रीपदावर असलेली टांगती तलवार कायम आहे. सत्ता स्थापनेवरुन कर्नाटकात निर्माण झालेला वाद आज निकाली लागण्याची शक्यता आहे. कारण यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज याबाबत आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा किती दिवस मुख्यमंत्रीपदावर टिकून राहतील हे आज स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात सकाळी १०.३० वाजता कोर्टात सुनावणी होणार आहे.

काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात येडियुरप्पांचा घटनेच्या विरुद्ध जाऊन होणारा शपथविधी रोखण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात जाऊन आम्ही येडियुरप्पांचा शपथविधी रोखू शकत नाही, मात्र, त्यावर सुनावणी घेण्यात येईल असे १७ तारखेला मध्यरात्री सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. तसेच येडियुरप्पांना बहुमताचा आकडा दाखवणाऱ्या आमदारांच्या नावांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. हीच यादी आज येडियुरप्पांना कोर्टात सादर करावी लागणार आहे. ही यादी जर ते सादर करु शकले नाहीत तर त्यांची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते.

दरम्यान, येडियुरप्पांना आज आमदारांच्या नावांसहित बहुमताचा आकडा सुप्रीम कोर्टात सादर करणार आहे. त्यामुळे कर्नाटकात घोडेबाजार सजण्याची चिन्हे दिसून येत आहे. त्यासाठी आपल्या आमदारांना भाजपाकडून पैशांचे आमिष दखवून खेरदी केले जाऊ नये यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना हैदराबाद आणि कोची येथे रवाना करण्यात आले आहे.