पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबणे अशक्य

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलची होणारी दरवाढ थांबणे अशक्य वाटत आहे कारण कच्चे तेल गेल्या 4 वर्षात सर्वांत महाग झाले आहे. आज ब्रेंट क्रूडने 80 डॉलर प्रति डॉलर हा आकडा गाठला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीसाठी ईराणकडून होणारा पुरवठा कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडने दुपारी 3.30 पर्यंत 80.14 डॉलर प्रति बॅरल हा आकडा गाठला आहे. यामहिन्यात ब्रेंट क्रूड 5 डॉलरनी महाग झाले आहे. दुसरीकडे युएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्लूटीआय) क्रूडची किंमतनेसुद्धा 72.30 डॉलरची पातळी गाठली आहे. ही सुद्धा नोव्हेंबर 2014 च्या नंतर आपल्या सर्वोच्च पातळीवर आहे.

अमेरिका आणि ईराणच्या दरम्यान झालेल्या अणुकरारापासून माघार घेतल्यानंतर याप्रकारची शंका व्यक्त केली जात आहे. ईराणकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होऊ शकतो. यामुळेच कच्च्या तेलाच्या किमती लागोपाठ वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम थेट घरगुती पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर होतो. वस्तुत: कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने तेल कंपन्याच्या खर्च वाढतो. यामुळे तेल कंपन्या आपला भार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपासून सुटका होण्याची चिन्हे सद्यातरी दिसत नाही.