ही आहे युवा काँग्रेसची ‘व्हाय नॉट हर’ मोहीम

नवी दिल्ली:  भारतीय युवा काँगेस ने राष्ट्रीय व राज्य स्तरावर आपल्या संघटनांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवावे असा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या युवा ऐक्याचे लक्ष्य, आपल्या संघटनांमध्ये महिलांची भागेदारी ३३ टक्के असावी याकडे आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे संयुक्त सचिव आणि युवा काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरु यांनी सांगितले की, ‘आम्ही आपल्या राष्ट्रीय स्तरावर असलेली समिती तसेच राज्य स्तरावर असलेल्या संघटनांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यावर जोर देत आहो.

तर प्रदेश स्तरावर असलेल्या संघटनाना देखील महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. आपल्या संघटनेत महिलांचे ३३ टक्के प्रतिनिधित्व वाढेवावे व संख्ये सोबत गुणवत्तेवरही समतोल बनवून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे ‘, असे ते म्हणाले.

सर्व प्रतिभावान महिला व पुरुष जे युवा कॉंग्रेस करिता निःस्वार्थ भावाने काम करतात त्याच्या करीत आमचे दार नेहमीच उघडे आहेत. युवा काँग्रेसने सोशल मीडियावर ‘व्हाय नॉट हर’ नावाने महिलांना जोडण्याकरीत एक मोहीम सुरु केले आहे.