पीडीपी-भाजपा सरकारला धोका नाही : राम माधव

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कुठल्याही धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत आहे असा विश्वास भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केला. सध्या दोन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचेही ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना सरकारच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले की, ” मी राजीनामा दिलेल्या पक्षाच्या आमदारांशी व दोन मंत्र्यांशीही बोलणार आहे. चर्चेनंतर राज्यात होत असलेल्या राजकीय घटनांबाबत निर्णय घेतला जाईल.”

दरम्यान, कठुआ बलात्कार प्रकरणानंतर सरकारने कुठल्या प्रकारची कारवाई करावी यावर चर्चा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या पक्षाच्या आमदारांची भेट घेण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाल्या आहेत. या खटल्याचा निकाल अति जलद न्यायालयात चालावा यासाठी मेहबुबा मुफ्ती जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाकडे विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.