…तर भाजपाने कर्नाटकला हिंसाचाराच्या आगीत लोटले असते : हार्दीक पटेल

Hardik-Patel-1

अहमदाबाद : गुजरातचे पाटीदार नेते हार्दीक पटेल भाजपा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येदियुरप्पावर हल्लाबोल करताना म्हणाले कि, मला काँग्रेच्या प्रामाणिकपणावर गर्व आहे. कर्नाटकमध्ये जे भाजपाने केले आहे तेच जर काँग्रेसने केले असते तर आतापर्यंत भाजपाने राज्याला हिंसाचाराच्या आगीत लोटले असते. काँग्रेसच्या प्रामाणिकपणावर तसेच त्यांच्या संवैधानिक विचारांवर गर्व आहे. काँग्रेसला बेईमानी करने जमत नाही. यामुळेचे चार राज्यांमध्ये जास्त जागा असतानाही पक्ष सरकार बनवू शकला नाही.

उल्लेखनीय आहे कि, कर्नाटकमध्ये 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे तसेच आपले सरकारही बनवले आहे. बी. एस. येदियुरप्पा यांनी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कर्नाटकमध्ये जे काही होत आहे ते देशाला घातक असल्याचे पटेल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कर्नाटकमध्ये जे काही होत आहे त्यात ना संविधान आहे, ना राज्यपाल, ना न्यायालय, ना जनतेचा जनादेश सर्वकाही आपल्या मनमर्जीप्रमाणे होत आहे. सत्तेची लालसा, हुकुमशाहीचे उद्दिष्ठ देशाला मागे ढकलत आहे, नष्ट करण्यात लागलेले आहे. माझ्या देशाला गो-यांपासून मिळालेले स्वातंत्र्य चोरांपर्यंत येवून अडकले असल्याचे पटेल म्हणाले.