विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघाचा द्विवार्षिक निवडणुक कार्यक्रम स्थगित

voting booth

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने दि. 14 मे 2018 च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराष्ट्र विधानपरिषदच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या ‍द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरिता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि. 12 मे 2018च्या प्रसिद्धीपत्रकान्वये मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण विभाग पदवीधर व नाशिक विभाग शिक्षक या मतदार संघाचा द्विवार्षिक कार्यक्रम घोषित केला होता.