धस यांचा विजयाचे गुपित क्षीरसागरांच्या आनंदात

बीड : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचा 76 मतांनी विजय झाला. मात्र भाजपाकडे असलेल्या मतांशिवाय धस यांना मिळालेली जास्तीची मतं कुठून आली, या प्रश्नाचे उत्तर या फोटोत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भारतभूषण क्षीरसागर यांनी गुलाल खेळून सुरेश धस यांच्या विजयाचा आनंद साजरा केला!

या छोट्याशा सत्कार सोहळ्यामध्ये भारतभूषण यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी होती. ते म्हणाले की “सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर मिळवलेला विजय आहे.”

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.