पीडीपीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम : मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर : भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सरकार पडले आहे. मात्र, यातच आता माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. आपल्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला वाचविण्यासाठी धडपडत आहेत.

भाजपने पीडीपी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर मध्ये फोडाफोडी केली तर काश्मीरमध्ये गावागावात यासिन मलिक आणि सय्यद सल्लाद्दीन तयार होतील. तसेच, तेथील परिस्थिती ९० च्या दशकासारखी होईल.यावेळी मुफ्ती यांनी भाजप आणि केंद्र सरकारला १९८७ ची आठवण करुन दिली. ‘जर दिल्ली सरकारने १९८७ प्रमाणे लोकांच्या मतदान हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला, तसेच, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे त्यांनी बजावले आहे.