भाजपच्या जुन्या मित्रांमध्ये नाराजीचा सूर ; संघाच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला त्याच्या पारंपारिक मतदारांच्या समर्थनाला मुकावे लागू शकते असे चिन्ह आहे. या शक्यतेमुळे संघाच्याही चिंतेत वाढ झाल्याची चर्चा आहे. सरकार ला चार वर्ष पूर्ण झाल्या नंतर भाजप सरकारच्या बैठकी मधून हा निष्कर्ष निघाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार हरियाणाच्या सुराजकुंड मध्ये येत्या गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस या विषयावर मंथन करण्यासाठी बैठक होणार आहे. मोदी सरकारच्यामंत्रालयाच्या कामकाजाचा ब्योरा घेण्यासोबतच भाजप समर्थनार्थ तळागाळात काम करणाऱ्या संघटनांचा ही अभिप्राय घेण्यात आला. त्यामध्ये भाजप आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्या वरून भरकटत असल्यामुळे वैश्य, जाट आणि गुर्जर संघटना नाराज असल्याचे समोर आले आहे.

याबातीत स्वदेशी जागरण मंचाने वेळोवेळी सरकार च्या नीती वर आपला आक्षेप नोंदविला आहे. या व्यतिरिक्त पंजाप, राजस्थान, दिल्ली पश्चिमी युपी मध्ये चांगली पकड असेले जाट आणि गुर्जर संघटना ही भाजप वर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या संघटनांचे मत आहे की, पंतप्रधानांनी सबका साथ सबका विकास धोरणात दलितांची जवळीक साधण्याच्या नादात बाकी घटकांकडे दुर्लक्ष केले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली- एनसीआर मध्ये बऱ्याच बैठका घेण्यात आल्या ज्या मध्ये संघाचे कार्यवाह गोपालकृष्ण, भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, महा सचिव राम माधव, आणि संघटन महामंत्री रामलाल उपस्थित होते.