१७ एप्रिलला शिवसेना उतरणार रस्त्यावर !

परभणी : शेतकऱ्यांना पिकविमा, गारपीट, बोंडआळीच्या अनुदान मिळावा, यासाठी शिवसेनेच्यावतीने १७ एप्रिल रोजी सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिंतुर सेलू विधानसभा अध्यक्ष राम पाटिल यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार शिवसेनेचे जि.प.गटनेते राम पाटील यांनी पत्रकार परीषद घेऊन १७ एप्रील रोजी आयोजीत केलेल्या मोर्चा बाबत माहिती दिली. यावेळी तालूका प्रमुख रणजित गजमल ,शेषराव वाघमोडे अतूल डख, रामेश्वर बहिरठ, जिजाभाऊ सोळंके, गौतम कणकुटे बाबासाहेब भाबट यांनी पत्रकार परीषेदकरीता पुढाकार घेतला.

यावेळी राम पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपचे सरकार असतांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यावर शेतक-याच्या प्रश्नासाठीभांडण करण्याची वेळ येत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पुढे ते म्हणाले , पिक विम्यात काही कंपनीने शेतक-याची फसवणूक केली आहे. ज्या पटीत विमा मिळणे अपेक्षीत होते त्याप्रमाणे अनुदान मिळत नाही. तर कोट्यवधी विमा रक्कम जमा करणा-या विमा कंपनीचे साधे जिल्ह्यात कार्यालय नाही. तसेच गारपिट बोंडअळी अनुदान हि रखडले आहे. त्यामूळेशेतकऱ्याची फारच बिकट परिस्तिथी झाली आहे.

याचबरोबर,घरकुलाच्या कामासाठी वाळू मिळत नाही वाळूचे दर गगणाला भिडले आहेत. तर दुसरीकडे तूर, हरभरा केंद्रावर काटे वाढविण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची तोडलेली विज पुर्ववत सुरु करावी, मनरेगाच्या सिंचन विहीरीला मंजुरी द्यावी.अशा अनेक मागण्यांसाठी १७ एप्रील रोजी खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार हरीभाऊ लहाने, जि.प.गटनेते राम पाटिल यांच्या उपस्थीतीत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.