लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराची ४४ .७५ कोटींची संपत्ती जप्त

पटना : रेल्वे कॅन्टीनच्या धनादेश घोटाळ्यात आरोपी असलेले तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर सक्तवसुली विभागाने (ईडी) मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. ईडी ने लालूंच्या परिवाराची ४४.७५ कोटी किंमत असलेल्या ११ जमीनी जप्त केल्या आहे.

नुकतेच धनादेश प्रतिबंधक कायद्याची एक प्रकरणात अधिकाऱ्यांनी ईडी ला संपत्ती जप्त करण्याची अनुमती दिली होती. अधिकाऱ्यांच्या मते पटनाच्या दानापूर परिसरात जवळपास ३ एकर क्षेत्रफळातल्या लालूंच्या परिवाराच्या जमिनीवर जप्ती फलक लावण्यात आला आहे. तसेच जप्तीचे कागदपत्र ही संबंधितांना पाठविण्यात आले आहे. तसेच आता पर्यंतच्या कारवाईत इडी ने जवळपास ४४.७५ लाख रुपयाची मालमत्ता जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.