वरून गांधींच्या हत्येचा कट उघडकीस

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीचे युवा नेते खासदार वरून गांधी आणि श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावर हत्येचा कट रचला जात असून आता तो उघडकीस आला आहे. आंतरराष्ट्रीय तस्कर दाऊद इब्राहिमचा हस्तक राशीद मालबारी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती उघड केली आहे. माहितीनुसार, मागील काही दिवसात राशीद मालबारी याला अबु धाबीमधून अटक करण्यात आले असून त्यावेळी त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबातून हा खळबळजनक खुलासा झाला आहे.

राशीदची कसून चौकशी केल्यानांतर गँगस्टर छोट्या शकीलच्या सांगल्यावरून वरून गांधी आणि प्रमोद मुतालिक यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता,असे राशीदने पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीनीसार, २०१४ मध्ये मंगळूर न्यायालयातून जामीन मिळवून राशीद नेपाळ मार्गे फरार झाला होता. तो छोटा शकीलच्या खास मर्जीतील असून, नेपाळमधील गुन्हेगारींचे काम तोच सांभाळत असत. २००० साली बँकॉकमध्ये छोट्या राजनवर हल्ला करण्यात आला होता, त्यात राशीदही सहभागी होता. त्यानंतर राशीद विरोधात लूक आऊट आणि रेड कॉर्नर नोटीसही जाहीर कऱण्यात आली होती. दरम्यान राशीदला अटक झाल्याचा वृत्ताला स्वतः छोट्या शकीलने दुजोरा दिला असून त्याला आता भारतात आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.