हिमा दासची गावातली ओळख ‘दारूबंदी कार्यकर्ता’

नवी दिल्ली : फिनलँड येथे जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक  पटकावत हिमा दास देशातील तरुणाईची आदर्श बनली आहे. पण हिमा केवळ अॅथलीट नाही; तिला सामाजिक भानही चांगले आहे, ती आधाडीची दारूबंदी कार्यकर्ता आहे. दारूबंदी व्हावी म्हणून तिने गावातील दारूची दुकाने तोडली आहेत.

तिचे शेजारी सांगतात. ती काहीही करू शकते. चुकीच्या गोष्टींविरोधात बोलण्यास ती जराही घाबरत नाही. आसामच्या ढिंग गावात हिमाने दारूबंदीसाठी स्वत: पुढाकार घेतला होता. चुकीच्या गोष्टींविरोधात बोलण्यास ती जराही घाबरत नाही.

आमच्यासाठी ती ‘ढिंग एक्सप्रेस’ आहे, असं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. गावातील लोकांनी दारूच्या व्यसनापासून दूर रहावं म्हणून तिनं गावातील दारूचे अड्डेच जमीनदोस्त केले आहेत. कुणालाही न घाबरता तिने हे काम केलं होतं, असं गावकरी म्हणाले.