युतीचा निर्णय आता सेनेने घ्यावा : मुनगंटीवार

पुणे : लोकसभा आणि विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपासोबत युती करायची की नाही, याचा निर्णय आता शिवसेनेने घ्यायचा आहे. युती झाली तर एकत्र लढू, नाही तर वेगवेगळे लढण्यास तयार आहोत, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली.

त्याचवेळी ‘माझे नाव हे युती तोडणाऱ्यांऐवजी जोडणाऱ्यांमध्ये असायला हवे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.