न्यायालयाच्या निर्णयाने अधिकार गमावल्याचा भास होतो – शरद पवार

पुणे : ऍट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण उत्तर भारतात दंगली उसळल्या. त्यामुळे अनेकांना आपला अधिकार गमावल्याचा भास होत आहे. देशातील गरीब लाेकांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांचे अधिकार कायम ठेवले पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात व्यक्त केले. अनुसूचित जाती-जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यात काही बदल करून चौकशीअंतीच गुन्हा दाखल करावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.

महाराष्ट्रात मंडळ आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यामुळे आरक्षणाचे दूरगामी सकारात्मक परिणाम आज समाजात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरक्षण सवलतीबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर टीकाही होते. समाजातील धनाढ्यांना सुखसोयी मिळतात, मात्र दुर्बल कष्टकरी वर्ग उपेक्षित राहतो. त्यांना समानतेच्या हक्कानुसार बळकट बनवण्यासाठी आरक्षणाची गरज आहे, असेही पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.

Facebook Comments