वाडी येथे सातशे रुपयांची लाच घेताना महिला तलाठीला पकडले

जळगाव: सातशे रुपयांची लाचेची मागणी करणा-या पाचोरा तालुक्यातील वाडी येथील महिला तलाठी पूनम रामलाल वरकड (वय 30) व कोतवाल मधुकर चुडामण पाटील (42) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेचा वारस लावण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याकडे तकक्रार केली. त्यानुसार १३ रोजी सापळा लावण्यात आला. त्यात तलाठी पुनम वरकड यांच्या सांगण्यावरून कोतवाल मधुकर पाटील यांनी ७०० रुपयांची लाच स्विकारतांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर वारस लावण्यासाठी वाडी येथील तलाठी पुनम रामलाल वरकड यांच्याकडे भोजे येथील तक्रारदार अर्ज केला होता. मात्र त्यासाठी तलाठी यांनी २ एप्रिल रोजी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.