सिद्धुंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

नवी दिल्ली : 65 वर्षीय गुरनाम सिंह यांना रस्त्यावर मारहाण आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने त्यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केल्याने दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण प्रकरण 27 डिसेंबर 1988 रोजीचे आहे.

या प्रकरणाची सुनावणी करताना पटियालाच्या सत्र न्यायालयाने 22 सप्टेंबर, 1999 रोजी सिद्धू आणि त्यांचे सहकारी रुपिंदर सिंह संधू यांची पुराव्याअभावी सुटका केली होती. पण पीडिताच्या कुटुंबियांनी या निर्णयाविरोधात पंजाब आणि हरियाणा कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने सिद्धू यांना भारतीय दंडविधान कलम 304 अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. आता त्यांच्यावर फक्त मारहाणी प्रकरणी खटला चालणार आहे. त्यामुळे त्यांची अटक टळली आहे.

रोडरेज प्रकरण हे 27 डिसेंबर 1988 रोजीचं आहे. सिद्धूवर आरोप आहे की, पंजाबच्या पटियालामध्ये 65 वर्षीय गुरनाम सिंह यांना रस्त्यावर मारहाण केली होती. यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला होता.
पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री आणि भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं आहे, तर केवळ मारहाणीप्रकरणी दोषी ठरवलं. यामुळे त्यांचा तुरुंगवास टळला.