सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दुसरा दणका

नवी दिल्ली: सर्वोच न्यायालयाने देलेल्या आदेशानुसार भाजपला बहुमत मिळविण्यासाठी तर धडपड करायचीच आहे , पण त्या पाठोपाठ आणखी एक धक्का न्यायालयाने भाजपला दिला आहे. कर्नाटक विधानसभेच्या नवचर्चित सदस्यांनी शपथ घेण्याआधी राज्यपालांनी कर्नाटक विधानसभेत अॅग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती कायदेशीर नसल्याचे सांगत आता न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. जेडीएस ने केलेल्या याचिकेवर
न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आधीच बहुमत सिद्ध करण्यासाठी मिळालेला केवळ एकाच दिवस आणि त्यात समोर आलेला अॅग्लो इंडियन सदस्याचा नवीन मुद्धा यामुळे भाजपच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.