राष्ट्रकुल स्पर्धा : ‘सुपर मॉम’ने जिंकले सुवर्णपदक

सिडनी : 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सर मेरी कोमने बॉक्सिंग 48 किलो वजन गटात मेरी कोम सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात केली.

भारताच्या खात्यात आता 43 पदकं जमा झाली असून, यात 18 केवळ सुवर्ण पदकं आहेत. भारताच्या एकूण पदकांमध्ये 18 सुवर्ण, 11 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.

गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी

भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरीही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.

2002 (मॅन्चेस्टर) – 69 पदकं

2006 (मेलबर्न) – 50 पदकं

2010 (दिल्ली) – 101 पदकं

2014 (ग्लास्गो) – 64 पदकं

2018 (सिडनी) – आतापर्यंत 43… अजून स्पर्धा सुरुच आहे…

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत

बॉक्सिंग (महिला 48 किलो वजनी गट) मेरी कोम सुवर्ण

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 65 किलो वजनी गट) बजरंग पुनिया सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) पूजा धांडा रौप्य

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 68 किलो वजनी गट) दिव्या काकरन कांस्य

बॉक्सिंग (पुरुष 91 किलो वजनी गट) नमन तन्वर कांस्य

नेमबाजी (पुरुष 25 मीटर रॅपीड पिस्टल) अनिश भानवाला सुवर्ण

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) अंजुम मोदगिल रौप्य

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स) तेजस्विनी सावंत सुवर्ण

थाळीफेक – सीमा पुनिया रौप्य

थाळीफेक – नवजीत धिल्लन कांस्य

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 74 किलो वजनी गट) सुशीलकुमार सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 76 किलो वजनी गट) किरण कांस्य

कुस्ती (पुरुष फ्रीस्टाईल कुस्ती 57 किलो वजनी गट) राहुल आवारे सुवर्ण

कुस्ती (महिला फ्रीस्टाईल कुस्ती 53 किलो वजनी गट) बबिता फोगट रौप्य

नेमबाजी (महिला 50 मीटर रायफल प्रोन) तेजस्विनी सावंत रौप्य

नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य

नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण

नेमबाजी (पुरुष – 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य

नेमबाजी (महिला – 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण

बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण

टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण

नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य

नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य

 

नेमबाजी (पुरुष – 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण

नेमबाजी (पुरुष – 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष – 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य

टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण

नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण

नेमबाजी (महिला – 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य

नेमबाजी (पुरुष – 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य

वेटलिफ्टिंग (पुरुष – 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य

वेटलिफ्टिंग (महिला – 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष – 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष – 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला – 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (महिला – 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण

वेटलिफ्टिंग (पुरुष – 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य

वेटलिफ्टिंग (पुरुष – 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य