सुनंदा पुष्कर प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सुब्रमण्यम स्वामींची याचिका

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीद्वारे चौकशी करण्यासाठी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालायने नकार दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार्टशीट दाखल केली आहे, त्यामुळे आता सुनावणी करण्याची आवश्यता नसल्याचे सुर्वोच्च न्यायालयाने उत्तरात सांगितले आहे.

याअगोदर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर लवकरच चार्जशीट दाखल करू, असे उत्तर दिल्ली पोलिसांनी दिले होते. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीद्वारे करण्य़ाची मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुर्वोच्च न्यायालयाच आव्हान दिले होते. स्वामी यांनी यासंदर्भात आणखी काही टिप्पणी कोर्टाने करावी अशी विनंती केल्यावर न्यायाधीश अरुण मिश्रा आणि न्यायाधीश एस. अब्दुल नाझीर यांनी प्रकरण संपले आहे (विनंतीचे) असे सांगत काम थांबवले.