यावर्षीसुद्धा 20 टक्के गुण घेणा-यांची एमबीबीएस मध्ये जागा पक्की

NEET

नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून फिजिक्समध्ये फक्त 5 टक्के, केमिस्ट्रीत 10 टक्के आणि बायोलॉजीमध्ये 20 टक्के गुण घेणा-यांना राष्ट्रीय पात्रता-सह परीक्षा (नीट) मध्ये मेडिकल उमेदवारांना प्रवेश दिला जात आहे. दोन वर्षांपासून नीटच्या पर्सेंटाईल सिस्टममुळे असे होत आहे. नीट अंतर्गत या सिस्टिममध्ये सामान्य बुद्धिवान विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून हा नियम बनविला गेला आहे. वर्ष 2016 पूर्वी सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना 50 टक्के कट-ऑफ आणि आरक्षणाअंतर्गत 40 टक्के कट-ऑफ आवश्यक होते.

2016 नंतर कट-ऑफ ला 50 टक्के आणि 40 पर्सेंटाईल करण्यात आले आहे. यामुळे नीटसाठी 18 ते 20 टक्के गुण प्राप्त करणा-यांनासुद्धा मेडिकल कॉलेजची दारे उघडी झाली आहे. यावर्षी सुद्धा 20 गुण मिळविणा-यांना आरामात प्रवेश मिळेल. वस्तुत: 2015 मध्ये सामान्य श्रेणीअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला 50 टक्के गुण आवश्यक होते. मात्र 2016 मध्ये विद्यार्थ्याला केवळ 50 पर्सेंटाईल मिळवणे आवश्यक होते. अर्थात 720 पैकी केवळ 145 गुण 20 टक्के आहे.

याचप्रमाणे आरक्षण श्रेणीच्या विद्यार्थाना 40 टक्के पर्सेंटाईल घेणे आवश्यक होते याचा अर्थ आहे 720 पैकी 118 (16.3 टक्के) घेणा-यांनासुद्धा प्रवेश मिळत होता. याचप्रमाणे 2017 मध्ये सामान्य श्रेणीच्या विद्यार्थांना 131 गुणे (18.3 टक्के) आणि आरक्षित श्रेणीसाठी 107 गुण (14.8 टक्के) आवश्यकता होती. यावर्षी पुढील महिन्यात होणा-या नीट परीक्षेसाठी कट ऑफचे हेच पर्सेंटाईल कायम असेल. याचाच अर्ध आहे प्रवेश परीक्षेत 20 टक्के पेक्षा कमी गुण मिळविणा-याला एक वेळ पुन्हा एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल.

पर्सेंटाइल परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या गुणावर आधारीत नसून त्याच्या अनुपातावर आधारीत असते अर्थात 50 पर्सेंटाईलचा अर्थ खालून सर्वात कमी अंक प्राप्त करणा-या अर्ध्या मुलांशिवाय उर्वरित परीक्षार्थी. याचप्रमाणे 90 पर्सेंटाईलचा अर्ध होईल.