कापूस व सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी भावात होत असलेली विक्री रोखा- शेतकरी मिशनचे सरकारला साकडे

Modi and Farmer

नागपूर: महाराष्ट्र कृषी संकटाचे व्यवस्थापन करणाऱ्या कै. वसंतराव नाईक शेती स्वा.मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील मुख्य नगदी पिके कापूस आणि सोयाबीनच्या होत असलेली हमीभावापेक्षा कमी भावात विक्रीसंदर्भात त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे मागील ५ वर्षापासून खुल्या बाजारात कापूस सोयाबीनच्या किंमती साधारणता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) पेक्षा जास्त मात्र व्यापाऱ्यांनी या किंमती तांत्रिक कारणे तसेच जागतिक मंदी अशी कारणे देत केंद्र सरकारच्या एजन्सीज कापूस महामंडळ (सीसीआय) आणि नाफेड यांच्या मवाळ धोरणामुळे शेतकऱ्यांची खुली लुट सुरु केली आहे.

यामुळे या भारतीय सरासरी एजन्सीज कापूस महामंडळ (सीसीआय) व नाफेड यांच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागातील क्षेत्रातील कापूस आणि सोयाबीनच्या खुल्या बाजारातील किंमती स्थिर ठेवण्यासाठी त्यांचे हस्तक्षेप फारच अपुरा झाला असुन या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रवण क्षेत्रात ७० लाख हेक्टर्समधील लागवडीचे क्षेत्र असलेल्या ४० लाख शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले.

सीसीआय आणि नाफेडच्या बाजाराची लुट रोखण्यासाठी खुल्या बाजारपेठेत हस्तक्षेप सक्रिय करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लिहलेल्या पत्रात कापूस आणि पाम तेल आयात करण्यावर बंदी घालणाऱ्या आयत धोरणातील बदलासाठी व तसेच एमसीडीईएक्स आणि एनसीडीईएक्समध्ये खुल्या व्यापारात सोयाबीला डीओसी याला परवानगी देण्याची मागणी लाऊन धरली असुन सोबतच कापूस व सोयाबीन व्यापाऱ्यांना निर्यात अनुदान देण्याची मागणी रेटली आहे .

या पूर्वी कै वसंतराव नाईक शेती स्वा मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुजरातमधील कापूस उत्पादकांना विशेष सवलत देण्याकरिता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे स्वागत करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या समकक्षांच्या पावलावर पाऊल घेण्याची विनंती केली आहे कारण त्यांच्या राज्यातील कापूस उत्पादकांना अत्यंत वाईट काळापर्यंत जात आहे. कारण राज्यातील कापूस लागवड ५० लाख हेक्टरवर आहे आणि त्यापेक्षा १५ टक्के जास्त आहे. महाराष्ट्रातील कॉटन कॉपोर्रेशन ऑफ इंडिया सह विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बोडअळी व गुलाबी अळीच्या हल्लाने आणि कीटकनाशक विषबाधामुळे राज्यातील कापुस उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. तरी गुजरात सरकारच्या हमीभावावर बोनसदेण्याची घोषणेची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचा आग्रह मुख्यमंत्र्याना धरला आहे.

किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लिहलेल्या पत्रात मागणी केली आहे कि महाराष्ट्र राज्यातील सर्व सीसीआय आणि मार्केटींग फेडरेशनच्या सर्व संकलन केंद्रे तात्काळ सुरू करण्याची व्यवस्था करण्यात यावी कारण पडेल भावात कापुस सोयाबीनच्या विक्रीने विदर्भ आणि मराठवाड्यांच्या कापूस व सोयाबीन उत्पादक क्षेत्रातील कृषी संकट व शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे

Facebook Comments