एसटीची ‘शिवशाही’ आराम बस मिळवते नफा

मुंबई : तोट्यात असलेल्या राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही या बसच्या माध्यमातून 10 दिवसांत सेवा पुरवून 1.71 कोटी रुपये कमावले आहे.

राज्यातील शिवशाही आराम बस सेवा ही संकल्पनाच मूळात राज्याचे वाहतूक मंत्री दिवाकर रावते यांची आहे. जी काही महिन्यांपूर्वी सुरु झाली होती. आता मात्र महामंडळाने मुंबई ते रत्नागिरी ही बस सेवा सुरु केली आहे. या नव्या सेवेच्या सर्व बस 16 मे पर्यंत आरक्षित आहेत. यात आणखी 30 आसनी वातानुकुलीत बस सेवेची भर पडणार आहे. मुंबई ते कोल्हापुर मार्गावर ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

राज्याचा अंगीकृत व्यवसाय असलेल्या या एसटी बस सेवेच्या ताफ्यातील 1113 सेवा 202 मार्गावर आहेत यात 751 शिवशाही बसेस राज्यात धावतात. यापैकी 20 बसमध्ये स्लीपर सेवा आहेत. यावर्षअखेर 1249 बसेस महामंडळाच्या ताफ्यात सामील होणार आहे. यामुळे राज्यात एकूण 2 हजार शिवशाही बसेस धावेल.

प्रत्येक बसची क्षमता (स्लीपर वगळता) 42 आसनांची आहे. या स्लीपर बसेसची क्षमता 30 जागांची असल्याचे या अधिका-यांननी सांगितले. शिवशाही ही बस सेवा दर दिवशी 35 हजार किलोमीटरचे अंतर व्यापते. ही बस 43 रुपये प्रति किलोमीटर कमावते. तर दर किलोमीटरचा खर्च हा 35 रुपये आहे. याचाच अर्थ दर किलोमीटरमागे 8 रुपये महामंडळाला नफा होतो, असे या अधिका-यांनी सांगितले.