राज्य सरकारचे धनगर अारक्षणाच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष ; प्रकाश आंबेडकर

मुंबई : राज्य सरकार धनगर समजला घेऊन गंभीर नाही . समाजातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्या तर्फे करण्यात येत आहे . संविधानाने धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीत केला असतानाही सरकार धनगरांना अारक्षण देण्यात अपयशी ठरले असल्याचा अाराेप भारिप बहुजन महासंघाचे पक्षाध्यक्ष अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी केला.

भाजप सत्तेत अाल्यानंतर धनगरांना अादिवासी दर्जा देण्याचे अाश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पुण्याच्या सभेत दिले हाेते. पण, सत्तेत येऊन साडेतीन वर्षे उलटली तरी अारक्षणाचा प्रश्न कायम अाहे. लाेकसभा निवडणुकीला सव्वा वर्ष उरले असल्यामुळे सरकार याबाबत निर्णय घेईल, अशी स्थिती नाही. अंमलबजावणीचा दिलेला शब्द न पाळून धनगर समाजाचा भावनिक छळ सुरू अाहे. त्यामुळे सरकारला धडा शिकवण्याची वेळ अाता अाली आहे, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

अारक्षणाच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून धनगर की धनगड असा वाद निर्माण करून त्यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न केला जात अाहे. परिणामी धनगर समाज अारक्षणापासून वंचित राहत अाहे. त्यामुळे या विराेधात सत्ता परिवर्तन घडवून अाणण्याची गरज असल्याचेही आंबेडकर म्हणाले .