एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापणार !

मुंबई : पगारवाढ व इतर मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या(एसटी)कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार या महिन्यात कापला जाणार आहे. तर राहिलेल्या ३२ दिवसांचा पगार पुढच्या सहा महिन्यात कापला जाईल.

भर दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यांनतर न्यायालयाने बेकादेशीर ठरवल्याने ९६ तासांनी हा संप मागे घेण्यात आला होता.